Ajit Pawar's banner
Ajit Pawar's profile picture

Ajit Pawar

@AjitPawarSpeaks1,654,176 subscribers

संकल्प, निष्ठा, कर्म- हाच माझा धर्म! उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य | Commitment, Conviction, Service- My Vision | Deputy Chief Minister- Maharashtra

Shorts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी जी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं, पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी जी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं, पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

573,975 views

नारायणगावच्या मार्गावर.. काहीतरी शिजतयं.. काहीतरी शिजतंय पण नेमकं काय ..? माझ्या लाडक्या बहिणीने बनवलेला कोणताही पदार्थ हा परिपूर्ण प्रेमाने भरलेला असेल आणि ती चव चाखण्यासाठी मी आतुर आहे..

नारायणगावच्या मार्गावर.. काहीतरी शिजतयं.. काहीतरी शिजतंय पण नेमकं काय ..? माझ्या लाडक्या बहिणीने बनवलेला कोणताही पदार्थ हा परिपूर्ण प्रेमाने भरलेला असेल आणि ती चव चाखण्यासाठी मी आतुर आहे..

49,629 views

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! राज्यातील जनतेला 'अनंत चतुर्दशी'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!विघ्नहर्ता श्रीगणरायाची कृपादृष्टी आपणा सर्वांवर कायम राहो, सर्वांच्या तमाम इच्छा, आकांक्षा पूर्ण होवो, प्रत्येकाच्या आयुष्यात हर्षोल्हास, सुख-समृद्धी, समाधान व शांती नांदो, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना करतो. #अनंतचतुर्दशी #गणेशोत्सव #GanpatiBappaMorya

13,441 views

Videos

AjitPawarSpeaks's profile picture

गेल्यावर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. महाराजांचा तो पुतळा कोसळल्याची घटना महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींप्रमाणे माझ्यासाठी देखील अतिशय क्लेशदायक आहे. मी शासनाचा भाग म्हणून आज जाहीर माफी मागितली. महाराजांचा पुतळा उभारताना तेथील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान यासारख्या महत्वाच्या बाबींचा वैज्ञानिक अभ्यास केला होता का ? पुतळा बनवण्याच्या सामग्रीची गुणवत्ता याचा शोध घेत संबंधित जबाबदार लोकांची राज्य सरकारने तातडीने चौकशी करत गुन्हे देखील दाखल केले आहेत. लवकरात लवकर राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना केली जाईल पण अशा प्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या प्रत्येक संबंधितावर कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल.

Ajit Pawar

67,819 views • 1 year ago

AjitPawarSpeaks's profile picture

राज्य सरकारच्या वतीनं टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यांसारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ काही ठिकाणी एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगानं माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू असून, सध्या या शिष्यवृत्तीसाठी या संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक निधी खर्च होत आहे. त्यामुळे इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी निधी उपलब्धतेवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. या स्वायत्त संस्थांच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देण्याच्या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली असून सदर चर्चेनंतर झालेल्या निर्णयानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत अधिछात्रवृत्ती योजनेंतर्गत यु.जी.सी. मार्फत विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करुन अधिछात्रवृत्ती योजनेचे निकष उच्च व तंत्रशिक्षण विभागानं तयार करावेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा वार्षिक प्रगती अहवाल तपासून उर्वरित अनुदान वितरीत करण्याच्या प्रक्रियेचा समावेश करुन त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना तंत्र शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्ती देताना प्रत्येक घटकासाठी लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोणत्या शैक्षणिक टप्प्यावर किती विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील. शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे. शिष्यवृत्ती मंजूर करताना संबंधित अभ्यासक्रमांचा राज्य व समाजाच्या विकासासाठी होणारा उपयोग तसंच विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आर्थिक परिस्थितीचा सखोल विचार करण्यात येत आहे. #हिवाळीअधिवेशन२०२५ #WinterSession2025

Ajit Pawar

24,726 views • 5 months ago