
MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR • 326,040 subscribers
Official X handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन https://t.co/vQ3dmidWWZ
Videos

अन्न व औषध प्रशासन विभागातील 'औषध निरीक्षक (गट-ब)' भरती परीक्षेतील पेपरफुटीबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितले आहे. #महाराष्ट्रलोकसेवाआयोग #औषधनिरीक्षकपरीक्षा #MPSC
MAHARASHTRA DGIPR50,411 Aufrufe • vor 2 Monaten

अन्न व औषध प्रशासन विभागातील 'औषध निरीक्षक (गट-ब)' भरती परीक्षेबाबत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या पेपरफुटीच्या दाव्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, संबंधितांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. #महाराष्ट्रलोकसेवाआयोग #औषधनिरीक्षकपरीक्षा #MPSC
MAHARASHTRA DGIPR10,618 Aufrufe • vor 2 Monaten

राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. मुख्य सचिव राजेश कुमार यांचा अल्पपरिचय आणि त्यांनी आतापर्यंत भूषविलेली पदे : मुख्य सचिव राजेश कुमार (भा.प्र.से. १९८८) यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६५ रोजी झाला. २५ ऑगस्ट १९८८ रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे. श्री.राजेश कुमार यांनी यापूर्वी सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदापासून २४ जुलै १९८९ रोजी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त, धाराशीव जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे. #मुख्यसचिव #महाराष्ट्र #मंत्रालय #ChiefSecreatary #GovernmentOfMaharashtra
MAHARASHTRA DGIPR23,435 Aufrufe • vor 1 Jahr

भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ हा माहितीपट पाहा... माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जुलै १९६८ मध्ये फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून हा माहितीपट तयार केला आहे. #DrAmbedkar #DrBabasahebAmbedkar #FilmsDivision
MAHARASHTRA DGIPR11,625 Aufrufe • vor 5 Monaten

कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील २ चरणांचे गीत महाराष्ट्राचे #राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यगीत गायन, वादन यासंदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
MAHARASHTRA DGIPR42,674 Aufrufe • vor 3 Jahren

मंत्रालयात सहज प्रवेश मिळविण्यासाठी #डिजिप्रवेश ॲपद्वारे नोंदणी करा तसेच 'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट'साठीच्या नागरिक सर्वेक्षणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य सचिव Sujata Saunik यांनी केले आहे. #DigiPravesh #विकसितमहाराष्ट्र२०४७ #विकसितमहाराष्ट्र
MAHARASHTRA DGIPR18,314 Aufrufe • vor 1 Jahr

विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकूण १४४० व्हीव्हीपॅटमधील स्लीप्सची मोजणी नुकतीच पूर्ण करण्यात आली. यामध्ये ईव्हीएममधील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत नाही- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी #EVM
MAHARASHTRA DGIPR18,538 Aufrufe • vor 1 Jahr