
Supriya Sule
@supriya_sule • 1,747,325 subscribers
Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements
Shorts
Videos

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे.याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हिएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे. Election Commission of India
Supriya Sule1,610,316 просмотров • 2 лет назад

'राज्य राखीव पोलीस दला'च्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुले जीवतोड मेहनत करीत असतात.आयुष्याची अनमोल वर्षे ही मुले परीक्षेच्या तयारीसाठी देतात. त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील एक दोन प्रश्न मूळ परिक्षेत येणे समजू शकते पण तब्बल ८५ प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी. CMO Maharashtra Devendra Fadnavis
Supriya Sule32,230 просмотров • 1 месяц назад

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारे देखील होती. या हल्ल्यात विकास लवांडे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. परंतु ही घटना अतिशय गंभीर असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविण्यात येत आहे. भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे उघड आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस
Supriya Sule24,680 просмотров • 27 дней назад

महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर (Sharad Pawar) नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. आणि साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या. स्थळ - यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई वेळ - दुपारी १.०० वाजता
Supriya Sule293,614 просмотров • 2 лет назад

क्रांतिज्योती सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु होत आहे. या मालिकेत खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर प्रख्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. डॉ कोल्हे यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांना महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. या मालिकेसाठी त्यांना तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा. एक चांगली मालिका रसिकांच्या भेटीस आणत असल्याबद्दल धन्यवाद...!
Supriya Sule59,177 просмотров • 6 месяцев назад

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला. हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.
Supriya Sule191,121 просмотров • 2 лет назад

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वाहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला. मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले. आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सांगितले. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती.त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे सांगितले. यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहन केले.
Supriya Sule14,532 просмотров • 1 месяц назад

लोकसभेत आज शून्य प्रहरात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री व माझे ज्येष्ठ बंधू स्व. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या भावाला जाऊन दोन महिने झाले. याच वर्षी २८ जानेवारीला माझ्या भावाचे प्लेन क्रॅश झाले. या घटनेला केवळ दोन महिने झाले आहेत. एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष जेव्हा जातो, त्याचं दुःख त्या कुटुंबालाच माहिती असतं. आम्ही पण हे सोसलं आहे. या घटनेला दोन महिने झाले पण माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला का ? माझा मोठा भाऊ महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. त्याला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाला कसा मिळणार? माझ्या मोठ्या भावाचा मुलगा रोहितला एक एफआयआर करायला जंग-जंग पछाडावे लागले. आमच्या राज्याने तर 'एफआयआर' नोंदवून घेतलाच नाही. त्यासाठी रोहित सर्वपक्षीय नेत्यांना भेटला. इतर राज्यांमध्ये गेला, अनेकांना विनवण्या केल्या की एफआयआर करा आणि त्याच्या काकाला म्हणजे अजितदादांना न्याय मिळू द्या, असे नमूद केले. एक एफआयआर करायला एवढी अडचण? या देशातील एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा जेव्हा एवढा मोठा अपघात होतो, त्याचा एफआयआर होत नसेल तर सामान्य माणसाने जायचं कुठे? तो माझा भाऊ होता, अजित पवार जेवढा माझा भाऊ होता, तेवढाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामधला एक लाडका नेता होता. तर एवढ्या मोठ्या नेत्याचा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको? माझी नम्रपणे हात जोडून महाराष्ट्र आणि भारत सरकारला विनंती आहे की अजितदादांसह सगळ्यांच्या अपघातांची पारदर्शक चौकशी करा. मग तो अहमदाबादचा असुदे, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये सीडीएस बिपिन रावत गेले तो असुदे, अगर एअर अॅम्ब्युलन्सचा झारखंडला झालेला अपघात असुदे, न्याय हा समानच असला पाहिजे. प्रत्येक कुटुंब मग तो पायलट असेल, माझा दादा असेल, अंगरक्षक असेल किंवा त्या विमानात असलेल्या महिला असतील, त्या विद्यार्थिनी होत्या, त्या तरुण मुलीला पण न्याय मिळाला पाहिजे. आधी आम्हाला सांगितलं गेलं की ब्लॅक बॉक्स मिळणार, आता सांगितलं जातंय की तो खराब झालाय, हे काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित केला. रोहित पवारांच्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी काल याच्यावर स्टेटमेंट केलं. पण माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे की तुम्ही जी काही चौकशी अगर तपास करणार आहात तो कालबद्ध चौकटीत करा. या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याची उत्तरं सरकारने दिली पाहिजेत. स्व अजितदादा पवारांच्या विमान अपघातातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे, अशी ठाम भूमिका मांडली.
Supriya Sule19,448 просмотров • 2 месяцев назад

वारीच्या काळात तसेच इतरही वेळेस रस्त्यावर जबाबदारीने वागणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु आज वारीमध्ये चालत असताना जुना जेजुरी फाटा झेंडेवाडी येथे रस्त्यावरच एक किया कार (नंबर - MH 12 UF 3332) बेजबाबदार पद्धतीने पार्क केलेली दिसली. या गाडीचा चालक ती गाडी सोडून कुठेतरी गायब झालेला होता. यामुळे रुग्णवाहिकेलादेखील रस्ता मिळू शकला नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. रस्ते सुरक्षा आणि नागरी जाणीव या दोन्ही दृष्टीने ही चुकीची बाब आहे. माझी पुणे पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे की कृपया आपण या बेजबाबदार वाहनचालकावर योग्य ती कारवाई करावी. पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police
Supriya Sule53,519 просмотров • 11 месяцев назад

हिंजवडी फेज 3 येथील मेगापॉलीस सॅफरॉन परिसरातील रस्त्यांची चिखलामुळे अतिशय दूरवस्था झाली आहे. याठिकाणी रस्त्याच्या परिस्थितीमुळे आज दिवसभरात व यापूर्वीही छोटे-मोठे असे अनेक अपघात घडले आहेत. येथील नागरीकांनी पीएमआरडीए, एमआयडीसी आदी आस्थापनांकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु तरीही हा रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. या रस्त्यांवरुन प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेता माझी शासनाला विनंती आहे की, कृपया सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी. PMRDA MIDC India collectorpune
Supriya Sule41,401 просмотров • 9 месяцев назад

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दाैऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे दिसले. गाडी नादुरुस्त झाल्याने प्रवासी पर्यायी वाहनाची वाट पाहत तिथंच उन्हांत थांबले होते. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने हे प्रवासी आणि लहान मुलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काही जणांना दुसऱ्या बसमधून खेड शिवापूरमधील टोल नाक्यावर सोडण्याची विनंती केली. तर काही प्रवाशांना माझ्यासोबत असणाऱ्या गाडीतून खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत आणले. याठिकाणी त्यांची तात्पुरती व्यवस्था केली. यातील बरेच प्रवासी सांगली आणि मिरजला जाणारे होते. यावेळी माझ्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि माझे काही सहकारी यांना प्रवाशांची सोय करण्याबाबत सांगितले. हे सर्वजण प्रवासी त्याच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये पाठवेपर्यंत थांबतील असा विश्वास दिला. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. तसेच प्रवाशांना टोलनाक्यापर्यंत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एसटी बसचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांचे आभार मानले. एसटी महामंडळाने आपण बाहेर सोडत असणारी प्रत्येक गाडी तपासून पाठविली पाहिजे. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील आजकाल वाढले असल्याचे प्रवासी सांगतात. राज्याच्या परीवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
Supriya Sule110,632 просмотров • 3 лет назад

Attended the INDIA Alliance floor leaders’ meeting in Parliament today.
Supriya Sule14,349 просмотров • 2 месяцев назад

खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केलेली ही कविता अवश्य ऐका... "काका, का? का, काका ?"
Supriya Sule74,967 просмотров • 2 лет назад

Priceless Moments 💕 truly blessed... Gratitude 💕 Happy Birthday Vijay 🎂❤️
Supriya Sule74,716 просмотров • 2 лет назад

आपला मतदार संघ, आपला अभिमान! 'एअर इंडिया' च्या विमानाने पुण्याहून दिल्लीला जात असताना एअर इंडीयातर्फे दिल्या जाणाऱ्या जेवणात हे मिक्स्ड लोणचे देण्यात आले. आनंदाची बाब म्हणजे हे लोणचे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील खळद, ता. पुरंदर येथील त्रिवेणी इंडस्ट्रीमध्ये तयार करण्यात आलेले आहे. आकर्षक पद्धतीची पॅकिंग आणि छान चव यामुळे हे लोणचे सगळ्यांच्याच पसंतीला उतरले आहे. एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला जेवणात आपल्या मतदारसंघातील हे पुरंदरचे लोणचे दिले जाते, याचा मला सार्थ अभिमान आहे. आदरणीय पवार साहेब आणि आईने देखील या लोणच्याची चव छान असल्याचे सांगितले. अशा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी खुपच अभिमानास्पद आहे.
Supriya Sule44,185 просмотров • 1 год назад