正在加载视频...

视频加载失败

आयुष्यभर हे भूत पाठीवरती बसून आपण जगतोय - संकर्षण कऱ्हाडे #मराठी

20,300 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

3 条评论

अभिजात मराठी 的头像
अभिजात मराठी1 年前

सुरेख ♥️♥️

Solar Heavy 的头像
Solar Heavy1 年前

- Come Around

मराठी माती 的头像
मराठी माती1 年前

दादा ❤️

相关视频

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत सदानंद मोरे सरांचं भाषण आवर्जून ठेवलं होतं. आपण कोण होतो, आपण काय पराक्रम करून ठेवला आहे, याचं भान मराठी जनता विसरली आहे असं मला अनेकदा वाटतं. आपला इतिहासच जर आपण विसरलो तर वर्तमानात आपण काय कामगिरी करणार? म्हणूनच सदानंद मोरे सरांना मराठी माणसाच्या कामगिरीचा लेखाजोखा थोडक्यात मांडावा अशी मी विनंती केली आणि त्यांनी देखील त्याला मान्यता दिली. सरांचं हे भाषण आवर्जून प्रत्येकाने ऐकावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. इतिहासकार जदुनाथ सरकारांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहिलं होतं की मरहट्टे (एकूणच सर्व मराठी समाज ) अफाट पराक्रमी आहेत, त्यांनी त्यांच्यातल्या काही गोष्टी बदलल्या तर पुढील १०० वर्षात हा समाज हा जगातील सगळ्यात वैभवशाली समाज असेल. मराठी माणसांच्यात पुन्हा एकत्र येऊन काहीतरी भव्य उभं करण्याची जिद्द निर्माण व्हावी असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे हे भाषण नक्की ऐका, त्यातून प्रेरणा घ्या. #वर्धापनदिन२०२५

Raj Thackeray

45,822 次观看 • 1 年前

आकाशी झेप घे रे पाखरा : मराठी मनाला प्रेरणा देणारे गाणे ‘आकाशी झेप घे रे पाखरा’, हे गाणे केवळ एक गाणे नाही, तर ते एका ध्येयाने भारलेल्या मराठी माणसाच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. हे गाणे प्रत्येक पिढीला प्रेरणा देते, आत्मविश्वास वाढवते आणि ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करण्याची शक्ती देते. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा तुज पंख दिले देवाने, कर विहार दिगंताने दाखव तुझी भरारी, उंच आकाशी न्याहारी नको अडखळू जमिनीवर, झेप घे उंच अंबरावर हे गाणे आपल्याला शिकवते की, आपल्यामध्ये अमर्याद क्षमता आहे. आपण आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचू शकतो, फक्त गरज आहे ती आत्मविश्वास आणि प्रयत्नांची. हे गाणे मराठी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून आहे.

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

27,695 次观看 • 1 年前

आज पुण्यात विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात, माझ्या हस्ते अभिनेते आणि माझे मित्र, श्री. रितेश देशमुख यांचा सत्कार झाला. या संमेलनाला मी उपस्थित रहावं अशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत यांनी मला गळ घातली. आणि त्याचा मान राखून, मी या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. यावेळी माझं मनोगत मी व्यक्त केलं. त्या मनोगतातील महत्वाचे मुद्दे... '... मी हल्ली अनेक ठिकाणी बघतो की २ मराठी माणसं भेटली की ती एकमेकांशी हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतात, का असं ? आपणच आपल्या भाषेचं अस्तित्व टिकवलं नाही तर कसं होणार ? आज महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये मराठी माणसांना जसा मानसन्मान मिळायला हवा तो मिळत नाहीये. त्यात आपली भूमी, इथली जमीन बाहेरचेच गिळंकृत करत आहेत. आपण इतिहास असं म्हणतो तो कुठल्यातरी प्रदेशाला पादाक्रांत करण्यासाठी झालेल्या लढाईचा इतिहास असतो. आज महाराष्ट्रातील जमीन गिळंकृत करण्याचा जो डाव सुरु आहे, त्यातून उद्या जर आपलं म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्वच पुसलं गेलं, तर मराठी भाषेचं अस्तित्व तरी काय राहणार आहे? मग आपला इतिहास तरी काय असणार ? यामुळे सरकारने मराठी भाषा टिकवण्यासाठी जसे प्रयत्न केले पाहिजेत, तसे प्रयत्न मराठी माणूस टिकावा म्हणून केले पाहिजेत. आम्ही आमच्या परीने मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी जे जे करणं शक्य आहे ते करत आहोत, करत राहू. सरकारने त्याला साथ द्यावी, काही वेळेला आमचे मार्ग वेगळे असतात, त्यामुळे सरकारने आमच्यावर केसेस टाकू नये, कारण जे आम्ही करत आहोत ते मराठी माणसासाठी करत आहोंत. बाकी साहित्यिकांनी साहित्य निर्माण केलंच पाहिजे पण भूमिका पण घेतली पाहिजे. आणि मराठी तरुण-तरुणींनी पण साहित्य वाचायला हवं, पुस्तक वाचलीच पाहिजेत. बौद्धिक मशागतीसाठी पुस्तकांना पर्याय नाही. आपला इतिहास, आपले महापुरुष हे जगापर्यंत आपण पोहचवले पाहिजेत, पण हे करताना सध्या आपल्या महापुरुषांना जातीत विभागणं सुरु आहे, ते थांबलं पाहिजे... आपण मराठी भाषिक म्हणून एकत्र आलो, आपल्या भाषेशी, संस्कृतीशी घट्ट राहिलो तर जगात आपलं कोणीच वाकडं करू शकणार नाही हे विसरू नका....' या भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहे. ती जरूर बघा..

Raj Thackeray

49,591 次观看 • 1 年前

एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏 राज ठाकरे ।

Raj Thackeray

98,359 次观看 • 6 个月前

नेहमी प्रमाणे हे असे परप्रांतीय मुंबईच्या मराठी ओळखी विरोधात गरळ ओकू लागले.. सदर चित्रफितीत संबंधित महिलेने महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी जे विधान केले आहे, ते अत्यंत आक्षेपार्ह व वेदनादायक आहे. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक ओळख नसून संत-महात्मे, समाजसुधारक आणि कष्टकरी जनतेच्या त्यागातून उभी राहिलेली संस्कृती आहे. अशा राज्याबद्दल अपमानास्पद बोलणे हे सामाजिक सलोख्याला तडा देणारे आहे. मतभेद असू शकतात, पण ते सभ्य भाषेत आणि तथ्यांच्या आधारे मांडले गेले पाहिजेत. कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला लोकशाही मार्गाने उत्तर देणे हे आपले कर्तव्य आहे. संबंधित व्यक्तीने आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा टाळावी. आपण सर्वांनी संयम राखून महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकजुटीने उभे राहूया. #मराठीएकीकरणसमिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

20,779 次观看 • 7 个月前

संपूर्ण परिसंवाद : स्वतः जिथे आहेत तिथे प्रगती होत नाही म्हणून दुसऱ्या विकसित भूभागावर स्थलांतर करायचं... ते करताना सर्व आयुधांचा वापर करून तिथे वर्चस्व प्रस्थापित करायचं आणि तिथल्या मूळ माणसांना गुलाम करायचं ही आक्रमकांची प्रवृत्ती असते... आणि त्याबाबत बेसावध राहिल्यामुळे शेकडो वर्ष ही हिंदभूमी गुलामगिरीत खितपत राहिली. जेव्हा महाराष्ट्र भूमीतून शिवछत्रपतींच्या रूपाने बंड पुकारलं गेलं तेव्हा कुठे हिंदभूमीच्या मनांमध्ये स्वराज्य-स्वाभिमान-स्वातंत्र्य याबद्दलच्या जाणिवा जाग्या झाल्या. आज मात्र शिवछत्रपतींचा वारसदार असलेला मराठी माणूस मात्र तेजाचा तो वारसा विसरला असंच वाटतंय. आजही वेगळ्या प्रकारचं आक्रमण सुरुच आहे... स्थानिकांना फसवून त्यांच्या हजारो एकर जमिनी विकत घेतल्या जात आहेत. हे आक्रमण आपण वेळीच लक्षात घेतलं नाही अन् बेसावध राहिलो तर आपण आपलं अस्तित्व गमावू शकतो. शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतूसारखे रस्ते होतात तेव्हा प्रगतीसह एक वर्चस्वनीती शिरकाव करते. आज रायगड जिल्हा मुंबईशी थेट जोडला गेला. धनदांडग्यांना आपला रायगड जिल्हा हाकेच्या अंतरावर आला. खरंतर रस्ते हे प्रगतीचे वाहक असतात पण महाराष्ट्रात त्या प्रगतीमागून दबक्या पावलांनी येणारी परकीयांची वर्चस्वनीती मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाव घालू शकते. भविष्यातील याच धोक्याची सूचना देण्यासाठी, स्थानिकांना जागं करण्यासाठी जे जे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात त्या सर्व घटकांशी माझा संवाद सुरु आहे. त्याच उद्देशाने महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भेटलो आणि त्याच उद्देशाने रायगड जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला.

Raj Thackeray

62,502 次观看 • 2 年前