Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

निवडणूक आयोगाला अजून एक झटका.....

25,952 просмотров • 11 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

निवडणूक मतदान घोटाळा अर्थात वोट चोरी या प्रकरणाची सुरूवात मुख्य निवडणूक आयोगाची निर्मिती कशी व्हावी, या मा. सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आताच्या सत्तारूढ पक्षाने लोकसभेत फिरवून घेतला. मा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, जर निर्वाचन आयोगाला पक्षाभिनिवेशापासून दूर ठेवायचे असेल, पक्षपाती कामापासून त्यांना रोखायचे असेल तर निवडणूक आयुक्तांची निवड करताना जी समिती नियुक्ती केली जाणार आहे; त्या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असावा. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संविधानाला पायदळी तुडविणाऱ्या या सरकारने सदरचा निर्णय लोकसभेत बदलून घेतला अन् सरन्याधीशांना त्या समितीच्या बाहेर काढून त्या जागी आणखी एक मंत्री असावा, असा निर्णय करून घेतला. त्यामुळेच आपल्याला हवा तो निवडणूक आयुक्त आणता येईल, असा त्यांचा कट होता, अन् झालेही तसेच ! त्यानंतर जे पहिले निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आले त्यांचे नाव होते राजीव ! हे राजीव भाजपचे बोलके बाहुले म्हणूनच काम करीत होते. या नंतरच महाराष्ट्रातील सरकार पडले. सरकार पाडण्यास जबाबदार असलेल्या अन् पक्ष स्वतःचा असल्याचा दावा करणाऱ्यांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाने पार पाडली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जो घोटाळा झाला, त्यामध्येही निवडणूक आयोगाचाच त्यात सहभाग होता. याची खरी सुरूवात जेव्हा मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून घेतला, तेव्हाच झाली होती. याचाच अर्थ हे प्लॅनिंग कधीपासून झाले अन् हा वोट चोरीचा कट कधीपासून रचला होता, याचा विचार आता जनतेनेच करावा. #VoteChori #VoteChor #ECI #ECIVoteChor

Dr.Jitendra Awhad

12,421 просмотров • 11 месяцев назад

आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल... बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन...

Raj Thackeray

163,388 просмотров • 8 месяцев назад