
Mrs Anjali Damania
@anjali_damania • 143,818 subscribers
Anti Corruption Activist who will only work in the best interest of our country. https://t.co/mRb5XAaGF5
Shorts
Videos

अहंकार…… फक्त आणि फक्त अहंकार मिसिंग लिंक ची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असतांना, सगळ्यांना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का एक मुख्यमंत्र्यांना ? प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये अफाट भ्रष्टाचार होत असतांना आवाज उठवला तर मुख्यमंत्री म्हणतात ‘देखलुंगा ‘ ? हेच फडणवीस कोणे एके काळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात मांडायचे. आता म्हणतात ‘देखलुंगा ‘. Full 180 degree change.
Mrs Anjali Damania121,481 views • 2 months ago

आज भाजपच्या प्रवीण दरेकर विरुद्ध पत्रकार परिषद घेतली. पण ती कोणत्याही माध्यमांनी दाखवली नाही. म्हणून ट्वीट करत आहे. माध्यमांना शिवीगाळ, फोडाफोडी, बिनविरोध निवडणूका कशा जिंकतां येतात, कोणी कोणाशी सेटिंग केले, ते कदाचित जास्त महत्वाचे असेल. आपल्या कष्टाचे पैसे हे एका बोगस सहकारी संस्थेमार्फत वाटून, दरेकर खिसे भरणार असतील आणि त्याला ‘देवाभाऊ टॅक्सी’ नाव देऊन राजकीय ब्रॅंडिंग करणार असतील तर ते मला मान्य नाही. मी केलेल्या तपासात ही देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्था ही ४/१२/२००१ रोजी स्थापन झाली, संस्थेच्या खात्यात ना पैसे आहेत, फक्त २८ सभासद आहेत, audit श्रेणी ‘ क’ आणि २०२५ ते २०२६ मधे बँकेत फक्त ₹ २४६/- होते. निवडणूक नाही, सह्या खोट्या ….धक्कादायक. महाराष्ट्राला टॅक्सी सेवा हवी आहे, राजकीय ब्रँडिंग नाही. आज मी आरोप करत नाही, अधिकृत कागदपत्रे बोलत आहेत. आता सरकारने उत्तर द्यावे.” ह्यापुढे भावना व्यक्त करण्यासाठी मी youtube चा वापर करावा का ह्या विचारात आहे. कारण लढणं थांबवता येणार नाही. आज सकाळच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे माझ्या ह्या वीडियो मध्ये आहेत. खाली reply मधे एक महत्वाचा स्क्रीनशॉट आहे. तो पहावा .
Mrs Anjali Damania89,512 views • 2 months ago

या व्हिडिओत धक्कादायक गोष्ट टक्केवारी नाही… धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या आमदारचा आवाज. ना भीती… ना संकोच… ना अपराधीपणा… निर्लज्यपणे विचारतात…. मालक कोण? जणू कमिशन मागणं हा जन्मसिद्ध हक्क आहे! जेव्हा भ्रष्टाचार लपवावा लागत नाही… तेव्हा समजायचं की सत्ता माजली आहे. आणि हो. मालक जनता आहे आणि ह्याचाच तुम्हाला विसर पडला आहे.
Mrs Anjali Damania55,858 views • 2 months ago

आयुष्यभराचे मतदार कार्ड एका क्लिकवर गायब ? तब्बल २१% मतदार गायब ? म्हणजे प्रत्येक पाचवा मतदार गायब ? महाराष्ट्रात एका फटक्यात २ कोटींहून अधिक मतदारांची नावं यादीतून गायब होणं, हा निव्वळ प्रशासकीय घोळ नाही, हा लोकशाहीवर केलेला मोठा हल्ला आहे. राज्यातील प्रत्येक पाचवा मतदार यादीबाहेर फेकला गेला आहे, आणि हे सर्वाधिक घडलं आहे पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, म्हणजे जिथे कष्टकरी, स्थलांतरित आणि गरीब वस्त्यांची लोकसंख्या प्रचंड आहे. हा योगायोग वाटत नाही. निवडणूक आयोग “मृत्यू, स्थलांतर, दुबार नोंदणी” अशी सोयीस्कर कारणं देत आहे. गणन फॉर्म वेळेत न भरता आल्यास थेट हक्क हिरावून घेणं, ही पद्धत घटनाबाह्य वाटते. माझी मागणी स्पष्ट आहे: •वगळलेल्या नावांची संपूर्ण यादी तात्काळ जाहीर करा •स्वतंत्र, पारदर्शक चौकशी करा •हरकती नोंदवण्याची मुदत वाढवा आणि प्रक्रिया सुलभ करा मतदानाचा अधिकार हा भीक नाही, तो घटनादत्त हक्क आहे, तो असा गुपचूप हिरावता येणार नाही.
Mrs Anjali Damania16,508 views • 20 days ago

सुषमाताई तुमचा व्हिडिओ पाहिला. प्रथमतः ह्या प्रकरणात मी DG श्री सदानंद दाते ह्यांची वेळ मागितली आहे. तुम्हाला काळजी नसावी. आता तुमच्या व्हिडिओ बद्दल…… तुम्हाला फक्त माझ्या विरुद्ध बोलायला फार आवडत असेल. मुद्द्यावर बोलण्या ऐवजी माझ्यावर इतका राग? पण विषय फार गंभीर आहे, माझ्याविरुद्धची लढाई दुसऱ्या दिवशीसाठी ठेवा. मी तुमच्याशी कुठल्याही स्पर्धेत नाही. खरतर तुम्हाला काळजी ह्या गोष्टीची वाटायला हवी होती की १) उपमुख्यमंत्र्यांनी १७ कॉल का केले? ते २१ मिनिट काय बोलले ? ते सत्तेत आहेत, मी नाही. २) रुपाली चकनकरांनी १७७ कॉल का केले? चौकशी व्हायला नको ? ३) सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, संजय शिरसाठ , दीपक लोंढे आणि मिलिंद नार्वेकर ह्यांची चौकशी कधी होणार? काय संबंध होते ह्या सगळ्यांचे ? मी ह्या मुद्द्यावर बोलते, त्या मुद्द्यावर नाही…. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी प्रत्येक मुद्द्यावर बोलत नाही. कारण आयुष्यात कुटुंब, मित्र, आणि इतर जबाबदाऱ्या आहेत. पण जेव्हा एखादा मुद्दा हातात घेते, तेव्हा पूर्ण ताकदीने लढते. फक्त बोलत राहत नाही.
Mrs Anjali Damania93,442 views • 5 months ago

हे असले थर्ड क्लास खासदार….. हे नेणार देशाला पुढे ? ह्या दोन्ही रिल्स पहा
Mrs Anjali Damania53,156 views • 3 months ago

कदाचित मी आक्षेप घेतल्याने ….देवभाऊ टॅक्सी चे नाव नमो टॅक्सी करण्यात आले…. पण त्यात काय बदलले? नाव “नमो” असो वा “देवभाऊ” आमचा विरोध तत्त्वाला आहे. हयात राजकारण्यांच्या नावाने सार्वजनिक पैशातून योजना राबवणे अयोग्य आहे. आजच नाही, उद्याही नाही. दोन - अमित शाह यांनी नुकतीच अशीच ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू केली आहे. मग देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचा Cold War आहे का? महाराष्ट्र सरकार “भारत टॅक्सी” का आणत नाही, ह्यामागे काय कारण आहे ते फडणवीसांनी आणि दरेकरांनी स्पष्ट करावे. २८ राज्यांनी आणि ८ केद्रशासित प्रदेशांनी वेगवेगळी टॅक्सी सेवा सुरू करून कसे चालेल? भरत टॅक्सी आणा ना महाराष्ट्रात, काय प्रॉब्लम आहे? नका भांडू आपापसात . एक देशी नाव, देशी उद्देश, देशव्यापी नेटवर्क. हे जनतेच्या हिताचे आहे. राजकीय श्रेयापेक्षा जनसेवा मोठी असते, हे सरकारला कधी कळणार? माझा दुसरा आक्षेप असा आहे की, ‘देवदत्त वाहतूक व पर्यटन सहकारी संस्था’च्या बँक खात्यात शून्य रुपये आहेत. या संस्थेने गेल्या २५ वर्षांत एकदाही निवडणूक घेतलेली नाही. संपूर्ण वर्षभरात ज्या संस्थेच्या खात्यात केवळ ₹२४६ ची उलाढाल झाली, अशा एका ‘शेल’ सहकारी संस्थेचं नाव बदलून ‘नमो टॅक्सी’ ठेवल्याने तिची पात्रता बदलत नाही. मुंबई बँकेचे कर्ज जर याच संस्थेला देण्यात येणार असेल, तर आमचे सर्व आक्षेप कायम आहेत. लोकांना नावात नाही, सेवेत बदल हवा आहे.
Mrs Anjali Damania37,920 views • 2 months ago

सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि मारदारांनी जरूर ऐकावे
Mrs Anjali Damania27,587 views • 3 months ago

दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरातर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. १७ तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते. पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत होतं? हे राजकारणी त्यांना संरक्षण देत होते ह्यात शंकाच नाही.
Mrs Anjali Damania114,429 views • 1 year ago

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर गलिच्छ, शिवराळ भाषेत टीका करणे हे “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” नाही, ती नैतिक दिवाळखोरी आहे. त्यांनी काय कपडे घालावे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्याबद्दल गलिच्छ शब्द वापरणे किलासवाणी आहे. द्वेष आहे म्हणून उगाचचं महिलांना लक्ष्य करणे स्वीकारार्ह नाही. कुठल्याही महिलेबद्दल बोलताना ही भाषा वापरणे तितकाच लज्जास्पद आहे जितका तो बलात्कारी. सभ्यता ही पर्याय नाही, ती बंधनकारक आहे. ह्या बाईंवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. लज्जास्पद आणि दंडनीय.
Mrs Anjali Damania45,625 views • 7 months ago

मुंबई पुणे missing link रस्ता कोसळत नाही… कोसळतोय तो जनतेचा सरकारवरील विश्वास. करदात्यांचे हजारो कोटी रुपये खर्च करून जर अशीच निकृष्ट कामं करायची असतील, तर उद्घाटनाच्या फिती कापण्यापेक्षा भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या हातात बेड्या घाला.
Mrs Anjali Damania16,156 views • 2 months ago

हे काय आहे काय ? गृहमंत्र्यांनी आणि श्री सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस चा कार्यकर्ता आहे का ? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पहा अँकर - बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा वीडियो पहा. अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
Mrs Anjali Damania73,507 views • 1 year ago

श्री दत्ता कराळे हे एक IG लेवल चे पोलिस अधिकारी असतांना खारतांसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले ? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खारतांवर विश्वास का नाही बसणार ? त्यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे त्यांचे देखील थोडे थोडके नाही तर तब्बल १८ कॉल आहेत. ह्याचे उत्तर पोलिस महासंचालक श्री सदानंद दाते सरांनी घेतले पाहिजे. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
Mrs Anjali Damania27,770 views • 5 months ago