
ashish jadhao
@ashish_jadhao • 167,420 subscribers
Journalist | Editor, Lokmat (Videos) | Earlier worked with Zee24Taas, IBN-Lokmat, Loksatta, Lokmat | This is my open space | Don’t judge me on my tweets |
Shorts
Videos

IAS Officer Dr.Pooja Khedkar issue needs to be investigated as the huge anger amongst the UPSC/MPSC aspirants. Now this video clip (of her mock interview taken by her coaching academy) gets viral on social media. If what’s she says is true then, she might have escaped the crème layer condition as well. 🗞️ Note : this clip is a viral one in the circle of UPSC aspirants of the state.
ashish jadhao965,401 views • 2 years ago

Just In 🗞 NCP-SP leader Jayant Patil in media today : “It was decided on January 16 to announce the merger after Zilla Parishad polls, on February 8. But since I was to attend a wedding in Delhi, Ajit dada said that whatever date you decide we will announce the merger. So, we decided on Feb 12. Ajit Pawar had told us that he had informed Praful Patel, Sunil Tatkare, Chhagan Bhujbal and other leaders of his party about the plans of merger.”
ashish jadhao72,342 views • 7 months ago

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना अख्खा महाराष्ट्र गेल्या ३५ वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरताना बघतोय, कधीही शब्दांचा तोल घसरू न देणारा एक सुसंस्कृत व सुशिक्षित नेता म्हणूनच जयंत पाटील यांची ओळख आहे. मग भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर इतक्या असभ्य भाषेत अश्लाघ्य वक्तव्य कसं करू शकतात. आमदार पडळकरांचं हे जाहीर प्रदर्शन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं आहे का? याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यायला हवं. ता.क. - आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून दिलगिरीची अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे आहे; तरी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष त्यांना किमान समज देतील, ही अपेक्षा! CMO Maharashtra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Ravindra Chavan
ashish jadhao69,099 views • 1 year ago

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान २९ एप्रिल,२०२४ रोजी मी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यात धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून मी शरद पवारांना प्रश्न विचारत असतानाच ते चिडले. पण त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबतीत तिखट भाष्य केलं. ते भाष्य तेव्हाही आणि आताही खास चर्चेत आलं. त्याची रिल सोशल मिडियावर खूप व्हायरल झाली. कळत नकळत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांचे ते भाष्य वर्षभरात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याशी पुन्हा जोडले गेले. अनेकांनी माझ्या प्रश्नावरील शरद पवारांच्या विधानाची दखल घेतली. (पण त्यात मला प्रश्नाचे श्रेय दिले नाही तो भाग अलाहिदा!) काहींच्या मते शरद पवारांचे ते भाष्य अजित पवारांसाठी अप्रत्यक्षपणे दिलेला सावधानतेचा सल्ला होता. पण काहींचं असंही म्हणणं आहे की धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवारांनी घेतलेली भूमिका आणि नाराजी अजित पवारांना आवडलेली नव्हती म्हणूनही ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास इच्छुक नव्हते. वगैरे वगैरे.
ashish jadhao88,094 views • 1 year ago

यंदाच्या फुटबॉलच्या महाकुंभात अर्थात ‘फिफा वर्ल्ड कप- २०२६’मध्ये आमचा मित्र व ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण याच्या रूपात मराठी पत्रकारितेचा सन्मान झालाय... मेक्सिको, कॅनडा व अमेरिका या तीन देशांमध्ये पार पडणाऱ्या फिफा विश्वचषकाचे तिथूनच एकमेव अधिकृत मराठी भाषिक क्रीडा समीक्षक म्हणून संदीप चव्हाण कव्हरेज करतोय.. थेट मेक्सिकोहून संदीपने हा ब्लॅाग लिहिलाय… त्यात तो लिहितोय, फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून हे शब्द मी लिहित आहे. ही केवळ एक नगरी नाही; हा फुटबॉलच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमर गाथेत कोरून ठेवले. त्या सुवर्णक्षणांच्या आठवणी अजूनही या शहराच्या हवेत तरंगताना जाणवतात. आज, त्याच मेक्सिको सिटीत, त्या इतिहासाच्या सावलीत उभा राहून, दै. मुंबई तरुण भारतचा क्रीडा प्रतिनिधी म्हणून अधिकृत मान्यता घेऊन विश्वचषकाच्या प्रेस बॉक्समधून वार्तांकन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. हा केवळ माझा वैयक्तिक प्रवास नाही; हा मराठी पत्रकारितेच्या स्वप्नांचा, जिद्दीचा आणि अस्मितेचा प्रवास आहे. जगातील २११ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. अब्जावधी चाहत्यांच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या आहेत, अशा या महाकुंभासाठी अधिकृत मान्यता मिळवणे हे कोणत्याही माध्यमासाठी अभिमानाचे असते. पण यावेळी अभिमानाची गोष्ट अशी की, महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच दै. मुंबई तरुण भारतला विश्वचषकाचे अधिकृत अॅक्रिडिटेशन मिळाले आहे. आणि त्या इतिहासाचा पहिला साक्षीदार, पहिला प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे. हा क्षण केवळ एका पत्रकाराचा नाही. हा प्रत्येक मराठी वाचकाचा आहे. हा त्या मातृभाषेचा आहे, जिच्या शब्दांमध्ये आपण जग पाहतो, स्वप्ने रंगवतो आणि भावना व्यक्त करतो. अनेक दशकांपासून इंग्रजी आणि इतर भाषांच्या माध्यमांनी गाजवलेल्या या जागतिक व्यासपीठावर आज मराठीचा आवाजही तितक्याच अभिमानाने घुमत आहे. मेक्सिको सिटीच्या रंगीबेरंगी रस्त्यांवर, स्टेडियममधील गगनभेदी जल्लोषात, चाहत्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये आणि विजयानंतरच्या आनंदोत्सवात मला जगभरातील भावनांचा महासागर दिसतो आहे. पुढील महिनाभर संपूर्ण जग हसू आणि आसू यांच्या हिंदोळ्यावर झुलणार आहे. कुणाचे स्वप्न साकार होईल, कुणाचे तुटेल; कुणी इतिहास घडवेल, तर कुणी इतिहासाचा भाग बनेल. त्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक थराराचा, प्रत्येक भावनेचा साक्षीदार म्हणून मी येथे आहे. आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या माझ्या मराठी वाचकांपर्यंत त्या प्रत्येक क्षणाची धडधड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, या फुटबॉलच्या महाकुंभात आपण सर्वजण सहभागी होऊया. मेक्सिकोच्या या ऐतिहासिक भूमीवरून, मराठी मनांपर्यंत पोहोचणाऱ्या या प्रवासाचे सहप्रवासी होऊया. कारण हा केवळ विश्वचषक नाही; हा मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. [email protected]
ashish jadhao11,702 views • 3 months ago

राज्य निवडणूक आयोग ही नावालाच त्रयस्थ संस्था आहे. तिच्याकडे कठोर कारवाईचे अधिकार नाहीत; त्यामुळे बिनविरोध व अर्ज बाद करण्यात काही रिटर्निंग ॲाफिसर्सदेखील सामील झाले किंवा ते हतबल होऊन साम-दाम-दंड-भेदातून झालेली निवडणूक अफरातफर बघत बसले, हे भारतीय लोकशाहीला अपेक्षित नाही! 🗳
ashish jadhao23,639 views • 8 months ago


