Loading video...

Video Failed to Load

Go Home

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोदी शेठला विनम्र विनंती!

15,173 views • 4 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांना अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली. यानंतर तात्काळ एनडीआरएफच्या पथकाने धाव घेवून या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. याठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. उत्तराखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात २८ जूनपासून राज्यातील सुमारे १५० पर्यटक अडकून पडले होते. परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने त्यांना परत येता येत नव्हते. ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात होती. तिथे अडकलेल्या पर्यटकांनी आपल्यापर्यंत मदत पाठवण्याची आणि आपल्याला सुखरूप ठिकाणी हलवण्याची विनंती महाराष्ट्र शासनाकडे केली होती. यापैकी अडकलेले पर्यटक आकाश जाधव यांच्याशी फोनवर संवाद साधून परिस्थितीची माहिती घेत त्यांना धीर दिला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत आज सकाळीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी पराग दकाते यांच्याशी संपर्क साधला. या पर्यटकांना मदत करण्याची त्यांना विनंती केली. त्यानंतर काही वेळात मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशीही फोनवरून संवाद साधत या पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्याची विनंती केली होती. आज एनडीआरएफच्या जवानांनी यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूपरित्या सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. मदत मिळाल्यानंतर तिथे अडकलेले पर्यटक आकाश जाधव यांनी या मदतीसाठी आभार मानले. तसेच माझ्याशी फोनवरून बोलल्यानंतर वेगाने चक्र फिरून अवघ्या काही तासात सुटका झाल्याचे त्यांनी सांगितले. #Uttarakhand

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

11,749 views • 1 year ago